औरंगाबाद- औरंगाबाद जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाची पाहणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. संबंधित रस्ता दर्जेदार करून लवकर पूर्णत्वास नेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर ला दिल्या.
औरंगाबाद जळगाव
या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरनाचे काम सुरू आहे. मागील काही वर्षांपासून या
रस्त्यावर वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली होती. मोठ्या प्रमाणात वाहने या रस्त्याने ये जा करत
होती. हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून जाताना मोठी अडचण येत
असायची. या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी वाहनधारकांनी लावून धरली
होती. ही मागणी भाजप सरकारच्या काळात
मंजूर करून औरंगाबाद जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होऊन
रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या रस्त्याचे काम दर्जेदार आणि उत्कृष्ट व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वतः कामावर जाऊन
प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला उच्च दर्जाचे
काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी फुलंब्री
चे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जि प सदस्य शिवाजी पाथ्रीकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, उपनगराध्यक्ष
योगेश मिसाळ, न.प. सभापती अजय
शेरकर, वाल्मिक जाधव, गजानन नागरे, नगरसेवक
बाबासाहेब शिनगारे, भाजपा तालुका
उपाध्यक्ष राम बनसोड, भाजपा शहराध्यक्ष
सुमित दादा प्रधान, कृषी उत्पन्न
बाजार समिती संचालक विलास उबाळे, राहुल बनसोडे, बाळासाहेब वाहाटुळे आदी च्या सोबत भाजपा कार्यकर्ते आणि
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








